कोविड योद्ध्यांचा सत्कार करून सोसायटीने घालून दिला चांगला आदर्श
ठाणे :(सागर कदम ) कळवा येथील मनीषा नगर मधील अक्षय को. ऑ.हौ.सो.लि.यांनी करोनाच्या महाभयंकर महामारीत माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. मनिषा नगर परिसरात कोरोनाचे रुग्ण भेटल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशा परिस्थितीत सोसायटीने पुढाकार घेवून मुबईत आरोग्य विभागात कार्य करणाऱ्या कर्मचार्यांचे कौतुक करत त्यांना शाब्दिक पाठबळ देत त्यांचे लॉकडाऊन काळात त्यांनी केलेल्या आपल्या अनमोल कामाचे कौतुक करण्यात आले आहे.
अक्षय को. ऑ.हौ.सो.लिचे अध्यक्ष राजेशिर्के, सचिव मलईकर, निवृत्त उपसचिव धावरे यांच्या संकल्पनेतून सोसायटीतील कोव्हीड योध्दा यांचा सत्कार करण्याचा विचार मांडून तो आमलात आणला. यातून सोसायटीतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले आदित, रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले अदित,ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले रिधेश सावंत, रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत वाघ, आणि सरकारी बृह्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागात कार्यकरणारे पांडुरंग काटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कोविड योद्धानी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी काटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुबईतील खाजगी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यासाठीच्या नियोजनाचे कोतुक करत सदर कर्मचर्यांना राहत्या घरापासून कामावर जाण्यासठी खाजगी वाहनांची सुविधा करण्यात आली आहे पण सरकारी कर्मचारी यांना मात्र आपले कार्यलय गाठण्यासाठी दोन -तीन बसेस बदलून दिवसातले तीन -तीन तास हा प्रवासात जात असल्याची खंत व्यक्त करत खाजगी आणि सरकारी कामातील पद्धतीवर काटे यांनी ताशेरे ओढले. तरी अशा परिस्थितीत एकही दिवस सुट्टी ना घेता रुग्णासाठी कामावर हजर राहिलेल्या काटे यांचे उपस्थितांनी खुप कौतुक केले. तसेच सध्याच्या घडीला प्रवास करणारे अथवा आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यामुळे करोना पसरतो हा नागरिकांमधील भ्रम कमी करत कोविड योद्ध्यांच्या अनुभवातून करोनाची जनजागृती करण्यात आली असून आरोग्य कर्मचार्यांचे मोनोबल वाढविण्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.