विमुक्त भटक्या समाजाचा आधारवड हरपला
मुंबई :
महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष, सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मा.लालसिंग चिंगुसिंग राजपूत यांचे दुःखद निधन
भटक्या विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटणारे मा. लालसिंग राजपूत यांचे वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.
मा.राजपूत हे महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स चे माजी अध्यक्ष , सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर,महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष,मागास समाज सेवा मंडळ नेहरूनगर चे उपाध्यक्ष,श्री बालाजी शिक्षण मंडळाचे बालाजीनगर चे विद्यमान अध्यक्ष, श्री बालाजी बिगरशेती पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील गांधीवादी विचारांचे व विमुक्त भटक्या समाजाचे उत्तुंग नेतृत्व हरपले आहे.
राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. हिरालाल राठोड,
युवा अध्यक्ष श्री. प्रभू चव्हाण, श्रीमती सविता बिराजदार, श्रीमती रुक्मिणी पवार, श्री. कृष्णा राठोड, श्री.गुरुनाथ राठोड, श्री. हुन्नेश चव्हाण यांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केली आहे.