बदलापुरात  कोरोनाचे ६ नवे रुग्ण

 

बदलापूर: बदलापुरात शनिवारी (ता.२३) कोरोनाचे ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४ रुग्ण बदलापूर पश्चिम तर २ बदलापूर पूर्व भागातील आहेत. रुग्णांमध्ये अंबरनाथ तहसील कार्यालयातील ३९ वर्षीय कर्मचारी, अभ्युदय बँक मुंब्रा येथील ३४ वर्षीय कर्मचारी, कामा हॉस्पिटल मुंबई येथील ३५ वर्षीय नर्स, ३८ वर्षीय बिल्डर तसेच मुंबईत काम करणारे ४६ वर्षीय पोलीस कर्मचारी व ३४ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे १५३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. ५५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.