अँड. सुनील पाटील यांची नियुक्ती
अँड. सुनील पाटील यांची नियुक्ती

बदलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण ओबीसी विभागाच्या सचिवपदी अँड. सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

    राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुद्धे, सरचिटणीस राज राजापुरकर यांच्या आदेशानुसार ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय कराळे यांनीे ही नियुक्ती केली आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे प्रदेश  सरचिटणीस सुभाष पिसाळ व प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे यांच्या हस्ते अँड. सुनील पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील व जिल्हा सदस्य पल्लवी गोपाळ आदी उपस्थित  होते.