मुलीची हत्या करून आईची आत्महत्या
बदलापुरातली खळबळजनक घटना
बदलापूर: तीस वर्षीय महिलेने स्वतःच्या सात वर्षाच्या मुलीची हत्या करून हत्या नंतर स्वतःही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापुरात घडली आहे.
बदलापूर पूर्वेकडील शिरगाव भागात ही घटना घडली. येथील ३० वर्षीय महिलेने धारदार सुरीने आपल्या सात वर्षीय मुलीच्या गळ्यावर पोटावर धारदार सुरीने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याच सुरीने स्वतःचा गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या महिलेने मुलीची हत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एच एम कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत.