बदलापूरचा आदित्य आंतरराष्ट्रीय स्पीड बॉलसाठी करणार भारताचे प्रतिनिधित्व

बदलापूर : स्पीड बॉल आणि थ्रो बॉल खेळाच्या इजिप्त येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बदलापुरातील सेंट एंथनी कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य सिंग याची निवड झाली आहे. येत्या एप्रिल महिन्यात ही स्पर्धा पार पडणार असून त्यासाठी आदित्यने जोमाने तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक जिंकण्याचा आदित्यचा मानस आहे. नुकत्याच राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने अहमदनगर येथे पार पडलेल्या शालेय स्पीडबॉल स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्व करणाया बदलापुरच्या सेंट एंथनी उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात ४ सुवर्ण, ९ रौप्य आणि ५ कांस्य पदकाची कमाई केली होती.


याच शाळेतील इयत्ता अकरावीत शिकणाया आदित्य सिंग याने आपल्या खेळातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पीडबॉल स्पर्धेत भारताचे भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान पटकावला आहे. येत्या एप्रिल महिन्यात ही स्पर्धा बॉलसाठी करणार भारताचे इजिप्तमध्ये होणार असून त्यासाठी सध्या आदित्य सिंग जोमाने सराव करत असल्याची माहिती विद्यालयाच्या शीतल टेंबुलकर यांनी दिली आहे.


इजिप्तच्या स्पर्धेनंतर लगेचच पोलंड आणि फ्रान्समध्ये होणाया आंतरराष्ट्रीय स्पीड बॉल आणि थ्रो बॉल स्पर्धेतही आदित्य भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. आपल्या या खेळात मिळालेल्या प्राविण्याचा फायदा घेत मर्चट नेव्ही क्षेत्रात करियर करण्याची इच्छा आदित्य याने व्यक्त केली आहे. शाळेतर्फे आदित्य याच्या खेळाचा आणि स्पर्धेचा खर्च उचलला जात आहे. नुकत्याच शाळेतर्फे आयोजित वार्षिक माध्यम संवादाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी गाउंडर, योगिता भागवत आणि राजीव दिवाण यांनी शाळेबद्दल माहिती दिली. गेल्या वर्षभरात शाळेत्या विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये शहराचे, मुंबई विभागाचे आणि राज्याचे प्रतिनिधीत्व केले असून या माध्यमातून शाळेने १७ राज्यस्तरीय आणि १४ स्पर्धा राष्ट्रीय खेळ दले असल्याची माहिती लक्ष्मी गाऊंडर यांनी दिली आहे.